STORYMIRROR

Bibhishan Giri

Tragedy

4  

Bibhishan Giri

Tragedy

पदराआडचं सत्य

पदराआडचं सत्य

1 min
247

काहीतरी होतं त्या 

पदराआड 

पण पुसटसही दिसत 

नव्हतं...


तिचा चेहरा भेदरलेला 

शरीरही थरथरत 

असं जाणवतही होतं 

की ती 

भुकेली असल्यासारखं 

पण ती असं का? करतेय 

कळतही नव्हतं...


सारखं टकमक टकमक 

त्या झाडाआड 

बघत होती 

मला रहावेना... 


मी बाजूला होत तिला 

वाट मोकळी करून दिली 

आणि ती 

तितकीच व्याकुळतेने 

धावत सुटली 

झाडाआड जाताच क्षणी 

एखाद्या लेकराचा 

रडण्याचा आवाज कानी 

पडताच 

माझ्या मनात एक 

पाल उठली... 


मी पुढे सरसावत पाहिलं 

तर ते बाळ होतं 

अपंग भुकेच्या वेदनेने 

विव्हळत पडलेलं...

आईची वाट बघत होतं 


आणि ती...

आणि ती आई तितकीच 

व्याकुळ होऊन पदराआडून 

त्याला काहीतरी खाऊ 

घालत होती 

त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद 

डोळे भरुन पाहत होती...

 

आणि स्वतः मात्र उपाशीच 

जणू तिचं पोटही 

त्या घासाने भरत होतं 

आता क्षणभर 

मी सगळंच विसरलो....

 

पदराआडचं सत्य लपवणारी 

ती आई....

पत्रावळीवर पडलेलं उष्टं अन्न गोळा करून 

पदराआड लपवून 

काळजाच्या तुकड्यासाठी नेत होती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy