!! माय माझी !!
!! माय माझी !!
1 min
218
माय माझी..
उठून
पहाटं अंगणी सडा
सारवण करून....
गाणं गाती
दळण दळीत
जात्यांवर
गोड गळा तिचा
वारसा जपे जनाईचा*
पिठ हसत खेळत
पडतं पोत्यावर....
मोठ्या मिठाबर
वर लसणाची कुड
खरडंण
पितळी तांब्यान रगडती
ठेसा तव्यावर....
माय माझी..
थापती भाकरी हातावर
पायी धरली
अंगठ्यात काटवट पसर
धुकं दाटलं
वरती छतावर....
धुर मायीनां
तिच्या डोळ्या
लाकडं धूपती चुलीवर
भाकरी
भाजती आरावर....
माय माझी..
अशी गुणवान
पाखरं
किलबिल किलबिल करती
पाखडण खायाला
जाव्हळात दारांवर
कानी येई ऐकू
टाळ, जप, मृदुंग
भजन पारावर....
