पडसाद
पडसाद
कठीण समयी आयुष्याच्या
दिली होती मला साथ
सोडला नाही अशा क्षणी
ठेवला धरुन घट्ट हात ……(१)
झाले खुप कधी भांडण
झाले जरी भरपूर वाद
पण दुसऱ्याच क्षणी कानी
आली तुझी प्रेमळ साद …..(२)
प्रेमळ सादाची वेल
निरंतर ही बहरावी
प्रेमाच्या वेलावर वाटे
विश्रांती क्षणभर करावी ….(३)
येई विश्रांतीच्या क्षणी
तुझी आंतरिक साद
माझ्या अंतर्मनात
घालते हा पडसाद ……….(४)
मनातील हा पडसाद
देई जगण्याची आस
जिवनातील उत्तरार्ध
राहील सुखाने खास ……..(५)

