STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

पावसात याद आली

पावसात याद आली

1 min
305

अशी पावसांती तुझी याद आली

सरी आसवांची तुझ्या बाद आली


किनारी किती रे तुझी वाट पाहू

मधे आडवी ती नदी रुंद आली


भिजे पावसांती मने चिंब होता

कशी आज कानी तुझी साद आली


बसे मी निवांती मनी ही अशांती

मनी आठवांची पले धुंद आली 


किती पावसाने मला सावरावे

कवाडे मनाची जरी बंद आली


कशी थांबवू मी प्रशांत सागराला

छळाया मला ती लाट मंद आली


गती आसवांची जरा ओसरावी

तशी पावसाची गती मंद आली


किती पावसाने मला येत काटे

मनातील पेटून बारूद आली 


        


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance