Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Durga Deshmukh

Romance Others

4.5  

Durga Deshmukh

Romance Others

पावसाची सर

पावसाची सर

1 min
212


अजुन ही आठवते मला 

पहिल्या पावसाची सर 

मी चिंब चिंब भिजताना 

तुझा हात केसातुन फिर ||१||


 एकमेकाना न्याहाळत होतो 

केसावरून ओघळत होत्या धारा 

केसाची बट लोबंती गालावर 

खोट्या करतो खट्याळ वारा ||२||


स्पर्श होता तुझा अंग शहारले 

लाजुन गाल गुलाबी झाले 

नजर झुकली खाली कशी 

प्रेमाला हे उधाण आले ||३||


 हळुवार स्पर्श तुझ्या हाताचा 

ह्दयात माझ्या छेदुन गेला 

ओठ थरथर कापरी झाली 

ओठाची भाषा बंद झाली ||४||


डोळे झाकुन मिठीत शिरले 

आनंदाने मन माझे फुलले 

दिल्या घेतल्या वचनाची आण 

भाग्या माझे तुझ्यासवे खुलले ||५||


हळवा स्पर्श उनाड वा-याचा 

जीव माझा वेडावून जाई 

पहिल्या पावसाची येता सर 

 आठवणीत सख्या भिजुन जाई 


Rate this content
Log in