STORYMIRROR

विवेक द. जोशी

Classics

2  

विवेक द. जोशी

Classics

पाऊस ओला हसला

पाऊस ओला हसला

1 min
215

 पाऊस ओला ओला हसला

 थेंबा थेंबातुनी बरसला

 पानापानांतुनी गाणी

 घुमू लागली रानोरानी ।।


 आला जमिनीचा जीवा

 तहानलेल्यांना हवा हवा

कोसळला दिनरात बाहेर आत

आला पूर पाणी घरा घरात ।।


माझा संसार सावरया

धाव धाव रे देवराया 

असा कसा हा पाऊस

घेउनी जीव नको रे जाऊस ।।


 धार संतत पावसाची

दिवस आणि रातीची

झाले पाणी पाणी चहूकडे

आता पावसा नको पडू गडे ।।


घातले पुराने थैमान महा

त्यात संसार वाहिले पहा

जीव देतो जीव घेतो पाऊस

नको मानवाच्या तोंडचा घास खाऊस


पाऊस ओला ओला हसला

थेंबा थेंबातुनी बरसला ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics