पाऊस-झुला
पाऊस-झुला
मनाला पावसाचे डोहाळे लागतात ,
पावसात भिजल्याचे सोहळे आठवतात....
क्षणैकाने मग आता भागत नाही तहान ,
आठवणींच्या राज्यात जाऊन पुन्हा होते लहान....
सोसाट्याच्या वाऱ्यात..फेर धरून नाचताना ,
मन मागे जात राहते.. टपोरे थेंब झेलताना..
अजूनही पाऊस पडतो , तोच आणि तसाच
अजूनही पाऊस नाचतो , घेऊन जातो मलाच..
धुंद-बेधुंद , चिंब चिप्प....आजही व्हावे वाटे,
पण पडणारे पाऊल पुढे, मन उगाच मागे ओढे..
हे असे का?ते तसे का? अजून प्रश्न सुटत नाहीत,
मोठेपणीही साऱ्या प्रश्नांची उत्तरे काही मिळत नाहीत...
वाटते कधी..काळाचे चक्र काहीसे उलट फिरावे,
बालवयाच्या मुक्या झुल्यावर फिरुनी परत झुलावे.......
