Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nilesh Jadhav

Romance

4  

Nilesh Jadhav

Romance

पाऊस आणि तू...

पाऊस आणि तू...

1 min
45


पाऊस खुप शोभायचा 

चमचमत्या तुझ्या देहावर,

गालावरून ओघळायचा तेंव्हा

जखमा करायचा काळजावर...


आठवतं का गं तुला...?

पहिल्या पावसात भेटायला आली होतीस.

रिमझिमत्या सरी अंगावर घेताना

शहारुन गेली होतीस...


लाजला होता हा पाऊसही

अलगद झालेल्या तुझ्या स्पर्शावर,

आणि मनही फिरून आलं होतं तुझ्यासवे

डोलणाऱ्या वाऱ्यावर...


पहिला पाऊस आणि तू...

कायमच उतरता माझ्या शब्दांवर,

आठवणींना सोबत घेऊन आजही गहिवरतो

तुजसाठी लिहिलेल्या या

पहिल्या पावसातील कवितेवर...


Rate this content
Log in