ओठांवरचा तीळ...
ओठांवरचा तीळ...


तुझ्या ओठावर असलेल्या
तिळाचा मला कधी कधी रागच येतो,
मी इतक्या दूर आणि
तो मात्र कायम तुझ्या जवळ असतो.
म्हणूनच ठरवलं आहे आता
तुझ्या डोळ्यांमध्ये अखंड बुडून जाताना
ओठांनी ओठांशीच
बोलायचं आहे....
त्या तिळालाही आता
थोडसं लाजवायचं आहे....