STORYMIRROR

Harshdip Awachar

Inspirational

4  

Harshdip Awachar

Inspirational

ओळख अखंड भारताची

ओळख अखंड भारताची

1 min
286

ही भूमी कोणाची?

ही भुमी वीरांची, श्रमाने घाम गाळणाऱ्या धिरांची,

 कामगारांची, मातीचं सोनं करणाऱ्या शेतकऱ्यांची..

ईथल्या कांही विशेष बांबी?

पूर्वेचा तो विशाल अरबी सागर,पश्चिमेचा समृद्ध उपसागर,

या धरेचा उद्धार करणारी ती प्रवाळ बेटे, कौतुक करणारे नदी-झरे 

हिमालयाच्या पायथ्याशी उमगलेल्या त्या परागकळया..

ही भुमी काय दर्शविते?

ही भुमी दर्शविते, संतानी केलेल्या उपदेशाचे सार, त्यांनी रचलेले महान महाकाव्ये, आणि कला संगीताने नटलेली ही संस्कृती...

इथला काही महान इतिहास?

शिवशंभूचा महान रायगड, दिल्लीची कुतुब मिनार, स्वतंत्रला लढा देणारी झांसी, स्वतंत्राच्या अस्तित्वसाठी रक्ताचे पाजळे जिथे वाहिले असा तो जालियनवाला बाग , स्मरितो तो १८५७ चा स्वतंत्र लढा...कणकणत, क्षणाक्षणाला स्मरिती तो अखंड भारत...

हो खरंच भाग्य माझे, मी भाग या भूमीचा -अखंड भारताचा, मी या मातीचा, राष्ट्राच्या हिताचा, मी याचे सदैव पांग फेडीन....

हर्षदीप सुनील अवचार....

कवितेचा प्रकार - मुक्तछंद



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational