STORYMIRROR

Harshdip Awachar

Abstract Inspirational Children

4.5  

Harshdip Awachar

Abstract Inspirational Children

श्रेष्ठत्व गुरूंचे

श्रेष्ठत्व गुरूंचे

1 min
438

विश्वात कसे जगावे? श्रेष्टत्व मला मिळाले

 गुरु‌ंच्या ज्ञानाने हे विश्व मला कळाले...


गुरुंनी दिली विद्या, विद्येने मिळाले ज्ञान 

ज्ञानाचे फुलले मोती, मोत्यांनी सजले रान


मानसांच्या बुद्धीने, अधिकत्या वृद्धीने,

 विकासाच्या दृष्टीने , गुरुच्या चरणातले आचरण मला आले..


श्रमातुनी, कष्टातुनी फुले ज्ञानाचे फुलले,

गुरुच्या विद्येमुळे कोंब झुलेरी झुलले....


विश्वासाच्या तळ्यांतूनी काळोखाच्या या अंधाराला प्रकाश जिथे मिळाला , आयुष्याच्या वळणावरचा मार्ग मला कळाला...


गुरु-विणा विद्या अपूर्ण, ज्ञान असे हे अधुरतेने, 

परिपक्व ज्ञानाचा सागर ,गुरुच्या या विद्ये मुळे.....


हर्षदीप सुनील अवचार....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract