||ओला मेघ||
||ओला मेघ||
घेऊन त्या ढगाला, वारा उन्हात आला|
मातीत वादळाने सारा, शिवार भरून गेला||
वाट पाहुनी कधीची, चातक थकून गेला|
गलीत झाली गात्रे, पोटात येतो गोळा||
सुकल्यात जाई-जुई विहिरी, तलाव सारे|
पोटात घास घेण्या, राहील प्राण का रे||
किती पाहशी आकाशी, उसण्या थकल्या मनाने|
मेघ येतील पावसाळी आता, आपल्याच मनाने||