STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

ओढ लागते मला

ओढ लागते मला

1 min
210

बघून मला हसण्याची

कशी तुझी गं कला

तुझ्या प्रीतीची पुन्हा पुन्हा

ओढ लागते मला


मीच लिहितो मीच गातो

तू फक्त ऐकत राहणार

भेटायला येते अस सांगून

मला वाट पहायला लावणार

आल्यानंतर उत्तर देण्याची

कशी तुझी ग कला

तुझ्या प्रीतीची पुन्हा पुन्हा

ओढ लागते मला


तू खुडता फुले पहाटे

एक कळी खाली पडणार

ती कळी येता तुझ्या हाती

मग आपोआप ती फुलणार

पाहून तुझ्या हातच्या

भाग्यवंत त्या फुला

तुझ्या प्रीतीची पुन्हा पुन्हा

ओढ लागते मला


भाव तुझे शब्द माझे

हेच अखेरी उरणार

समजण्यास हे नाते आपले

सारे जीवन अपुरे पडणार

या क्षणी मम आयुष्याची

मी भेट देतो तुला

या आयुष्यात तव प्रीतीची

ओढ लागते मला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance