STORYMIRROR

Archana Rahurkar

Romance

4  

Archana Rahurkar

Romance

ओढ भेटीची

ओढ भेटीची

1 min
1.3K

वाट पाहून पदरी

प्रिया आली ही निराशा

ओढ लागली भेटीची

ठेवून मनी मी आशा


स्वप्न रंगवी प्रितीची

इच्छा होती मनी दृढ

पुन्हा एकदा भेटीची

साथ नाही नशिबाची


वेळ आली होती अशी

ओढ ही तुज भेटीची

ठरले सारे मनात

राजा शपथ प्रितीची


ना तुही जवळी मग

मन ना राही आनंदी

ना जीव हा कशामधी

आसू हे नयनामधी


मनी पण प्रत्यक्ष नाही

आठवणीत दिवस

मात्र हा कटत नाही

विरह संपत नाही


तनामनाचे काहूर

का कसे थांबत नाही

मन माझे वेडे असे

का कुठे लागत नाही


आस ही हातात हात

नि असावी तुझी साथ

ओठ हा ओठी भिडावा

असा सुधा रस प्यावा


बाहुत घेत विसावा

प्रत्येक क्षण झुलावा

ही ओढ दाट भेटीची

तुझ्या नि माझ्या प्रितीची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance