STORYMIRROR

Pranali Parab

Inspirational

3  

Pranali Parab

Inspirational

न्यूनगंड

न्यूनगंड

1 min
392

मनाच्या खोलवर एक आघात होतो अंधाधुंद..

खरंच कळत नाही का आणि कसा निर्माण होतो हा न्यूनगंड....


स्वतःच्या क्षमतेवर उभा राहतो प्रश्रचिन्ह...

सार काही दिसू लागत बेचिराख आणि सुन्न..

पायांचा उडतो थरकाप, बेबळ होतात दंड...

खरंच कळत नाही का आणि कसा निर्माण होतो हा न्यूनगंड....


सारे लोक वाटू लागतात सर्वश्रेष्ठ...

स्वतःची किंमत होऊ लागते कनिष्ठ..

प्रगतीच्या गतीचा वेग होऊ लागतो मंद...

खरंच कळत नाही का आणि कसा निर्माण होतो हा न्यूनगंड....


अरे माणसा साठव मनगटात बळ आणि घे भरारी उंच...

दाखव तुझी कला,खुला आहे हा रंगमंच....

सोडून साऱ्या जगाची चिंता निर्माण कर यशरूपी कलाकंद ...

कारण मनात असेल जिद्द तर काहीच करू शकत नाही हा न्यूनगंड...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational