STORYMIRROR

Pranali Parab

Others

3  

Pranali Parab

Others

सुंदरतेची कुरूप व्याख्या

सुंदरतेची कुरूप व्याख्या

1 min
324

देवाच्या या विश्वात कलियुग सुरू झालं आणि गुणांपेक्षा रुपालाच भार देऊन गेलं....


एका स्त्री ची व्यथा काय सांगू तुम्हाला,तिने सुंदर दिसलच पाहिजे हा दोष तिच्या माथ्याला...


ती कशी दिसते,कशी वागते,कशी राहते या कडे सगळं जग टपुन बसलेल असतं...

तिच्याही नकळत आलेल्या त्या काळ्या छटांचा जाब तिलाच विचारत असतं...


तिच्याकडे त्या रोखून पाहणाऱ्या नजरा,ते कुजबुजणारे आवाज हे सगळं तिला जाणवत असतं..

आणि म्हणूनच कदाचित तिचं स्वतःला दोष देणं दिवसेंदिवस वाढतच असतं....


हिची उंची किती छोटी आहे,हीच वजन किती वाढलय,हीचा चेहरा का असा दिसतोय,हीचा रंग किती काळा आहे,असे अनेक प्रश्न तिला रोज विचारले जातात..

आणि आपसूकच तिला हळू हळू नैराश्याच्या दरीत ढकलू लागतात....


तिचा आत्मविश्वास पार डगमगून जातो...

लोकांशी सामना करण्याचा विचार सुद्धा मनाला त्रास देऊन जातो...


एका बंद खोलीत स्वतःला सामावून घेणं ती जास्त पसंद करते...

कारण सुंदरतेची ही कुरूप व्याख्या अशीच चालू असते...कारण सुंदरतेची ही कुरूप व्याख्या अशीच चालू असते......


Rate this content
Log in