STORYMIRROR

Pranali Parab

Romance

3  

Pranali Parab

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
249

हळूहळू मनाला कळू लागलं असतं...

कोणीतरी मनात भरू लागल असतं ...

कधी कुठे कसं काय काहीच कळत नसतं...

कारण पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं......


मैत्रीच रूपांतर प्रेमात होत असतं ...

प्रेमाची नव्याने ओळख करून देत असतं...

लपूनछपून सगळं काही हळुवार होत असतं ...

कारण पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं......


स्वतःहून सगळं काही कबूल करायच असतं...

प्रेमाच्या जाळ्यात अडकून रहायचं असतं...

जग सगळं सुंदर नवीन वाटत असतं...

कारण पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं......


सगळ्यांशी खोटं बोलुन चोरून भेटायच असतं...

एकमेकांच्या मिठीत हरवून जायच असतं...

तो क्षण कधीच संपू नये असं वाटत असतं...

कारण पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं........


प्रेमाची भाषा, भाषेतला गोडवा, गोडव्यातला आनंद सगळं काही हवंहवंसं वाटत असतं...

कारण पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं.... पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance