नवीन वर्ष
नवीन वर्ष
चल राणी आलं नवीन वर्ष
पाहातील सारे आपल्या प्रेमाचा हर्ष ....
उन्हाळ्याच्या सुट्टीत येशील दरवर्षी
अठराव्यात पाऊल जागशील हया वर्षी
सगळ्यात वेगळी तू माझी रातराणी....
अग मे महिन्याची पाहिली वाट
आज समोर तुझ्या प्रेमाची लाट
वाहू दे तुझ्या समुद्रात गोड तुझ पाणी...
गच्ची वरून ती लपून पाहते
पाहिलं की माझ्यावर चिडून जाते
कशी सांगू मनाची बात तू माझी राणी....
गावात रुबाबात ती फिरते
पाहिलं तिला कोणी कानाखाली लावते
आगावू स्वभाव तिचा मंजुळ वाणी....
संगमला तीनं आज हसून पाहिलं
प्रेमाचं उत्तर तीनं दोन शब्दात दिलं
प्रेमात तिच्यावर लिहून गाऊ लागलो गाणी.....

