STORYMIRROR

Khajabhai Bagwan

Classics

2  

Khajabhai Bagwan

Classics

नटरंग

नटरंग

1 min
14.9K


चढवुनी रंगाचा मुखवटा

ओलांडला त्याने उंबरठा,

प्रबोधनकार तो नटरंग

अभिनयाचे उधळतो रंग...


जीवन त्याचे नाश झाले

या तमाशाला रंग आले,

संसार त्याने न उभारले

नटराजचे प्रतिरूप बनले...


नटरंग तू नाजूक कळी

नारीची तुझ्यात अदा,

जन सारे जाहले दंग

पाहुनी नटरंगाचे रंग...


तमाशात तू वाजवी तुंतूने

ताल धरला त्याने घुंगराचा,

लेऊनी घुंगराची चाळ

हिरा तू तमाशाचा...


जीवनाची केली तू दैना

गणगोत कोणी ही पुस ना,

पाहुनिया नटरंग तुजला

आज आरसा ही लाजला...


समाज तुझ्यावर षंढ म्हणुनी हसला

तुझ्या अभिनयात तो फसला,

तुझ्या कर्तृत्वापुढे झुकला

शेवटी त्यानेच पुरस्कार देऊनी मुजरा हो केला...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics