STORYMIRROR

ख्वाजाभाई(छोटेभाई) बागवान

Others

4  

ख्वाजाभाई(छोटेभाई) बागवान

Others

मी पुन्हा येईन

मी पुन्हा येईन

1 min
560

तू नकार जरी दिला तरी चालेल

माझ्या दिलाची बात सांगण्यास 

मी पुन्हा येईन


तुझा नकार ऐकण्यास,

माझं प्रेम तुझ्यावर दाखवण्यास 

मी पुन्हा येईन


भले गल्लीतून तुझ्या जाताना

तुझ्या भावाने मारलं तरी

तुला पाहण्यास तुझ्या गल्लीत 

मी पुन्हा येईन


तुला पाहण्यास पाहुणे जरी आले

तरी तुला मागणी घालण्यास

मीच पुन्हा येईन


तू कितीही नकार दिला तरी

तुझ्या काळजचा तुकडा म्हणून

मी पुन्हा येईन


तुझ्या मनातील शब्द ओठांवर

येण्यासाठी रात्री स्वप्नात 

मी पुन्हा येईन


जरी तुझे लग्न ठरले तरी

वऱ्हाडी म्हणून तुझ्या घरी

मी पुन्हा येईन


काहीच नाही जमलं तर शेवटी

तुझ्या मुलाचा मामा म्हणून

मी पुन्हा येईन


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ