STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy Others

नको वार्धक्य रे देवा

नको वार्धक्य रे देवा

1 min
545

वितभर   पोटासाठी

खांद्यावर मोळी आणी

येत नाही कीव मुलां

कशी आहे जींदगानी.....!!


आले वार्धक्य नशिबी

अंगी ताकद रे नाही

रोज जातो मोळीसाठी

होतो जीव लाहीलाही......!!


सहचारिणीही गेली

देवाघरी  अचानक

मनी विरह  दाटतो

होती वेदना भयानक.....!!


गळा माळ तुळशीची

आहे  अपुरे  धोतर

काठी आधाराला राही

आयुष्याचं  रं  पोतरं.....!!


अवसान   जोपर्यंत

स्वाभिमानी हो धरीन

नांव घेत रे  विठ्ठला

कष्ट  अपार  करीन.....!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy