STORYMIRROR

sarika k Aiwale

Inspirational

3  

sarika k Aiwale

Inspirational

नको पाहू अंत...

नको पाहू अंत...

1 min
216

भाव हा भुकेला |भक्तीचा विठ्ठला|

येशी भेटायला|  पांडुरंगा || १||


सुखे नाम घेता | शुद्ध मुखी चित्ता |

लाभले अनंता | तुझा संग ||२||


अवीट ती गोडी|  संताचीया जोडी |

मना मोह सोडी | मायामिती ||३||


दुर्गुणांच्या संग | अक्षय निसंग |

मोक्ष कैसा सांग | मिळी तुजं ||४||


अंतरी ही चिंता | भय ही वसता | 

कैची भेटी आता | आभाविंका ||५||


किती अंत आता | पाहसी अनंता ||

उरे प्राण आता |  नयनांती || ६||


एकादशी भेटी | संताची आहुती |

प्राण येतो मुखी | अभंगांती ||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational