नजारा
नजारा


आनंद आज चोहीकडे
पसरलेला आहे बघा
घरातून बाहेर पडून
सुंदर नजारा हा बघा
सूर्य उगवला छान
नभापरी किती गोड
बघू दे रे तुला आज
मनसोक्त किरणे पाड
तुझ्याकडे बघत राहू
सूर्य उगवत्यावेळी
नयनात सामावून घे
अश्रूंना तू माझ्या
असाच आनंद रोज
देत राहा तू मला
सामावून घेईन मी
डोळ्यात रे तुला