निसर्ग वर्णन
निसर्ग वर्णन
मन ओढले अंगणी
शोभा आली ठेंगणी
चाल मृगनयनी
चंद्रकला शांत सदनी !
जशी मोहक कस्तुरी
पाहूनी झाली बावरी
ऋतु राणी हासरी
वाजविते बासरी !
चाफेकळी नाक असलेली
सुंदर तनु ल्याली सावली
हिरवेगार मखमली वस्त्र
यातच शोभे मनमोहक अस्त्र !
या सुंदरीचे करून वर्णन
कवि प्रतिभा उजळली
अन् लेखणी झळाळली
प्रतिभाशक्तीची !