STORYMIRROR

Ashwinee Chaudhari

Abstract

3  

Ashwinee Chaudhari

Abstract

निरोप

निरोप

1 min
391

बोलण्यासाठी जेव्हा जीव आतुर होतो

तेव्हा नेमके भावनेला शब्द फितूर होतात

विचारांच्या वाटेवर शब्दांची फुले अपुरी पडतात

तेव्हा नि:शब्दांच्या कळ्या आपली साथ करतात

तरीही भरलेल्या श्वासांना व हुंदक्यांनाही बाजूला सारत

मला प्रत्येकाच्या मनात डोकावण्याचा भास होत आहे


काय चालू असेल प्रत्येकाच्या हृदयात

माझ्याच निरोपाचा मी सोहळा पाहत आहे

गर्दीत असूनही मी एकटीच आहे

सुरुवात जिथून केली

त्यांना मी शोधत आहे

आई-बाबांनी इथे सोडलं

त्यांच्याच घरट्याकडे पुन्हा जात आहे


अथांग आहे आकाश

विस्तीर्ण आहेत शिखरे

मुक्यानेच मला ते खुणावत आहेत

कसे असेल ते नवीन जग

त्यात असेल का नाव माझे

दाणा-पाणी माझ्या नावाचा, असेल का गाव माझे?

माझे सगळे सवंगडी,

पुन्हा भेटणार का कधी?

की आकाशातील पाखरांप्रमाणे

ही शेवटची भेट आहे?

की ही शेवटची भेट आहे?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract