STORYMIRROR

Ashwinee Chaudhari

Others

3  

Ashwinee Chaudhari

Others

पेट्रोल तू ग माझी प्रियसी....!

पेट्रोल तू ग माझी प्रियसी....!

1 min
188

प्रिये, कसा सांभाळू ग मी तुला या महागाईत?

तुझी किंमत तर वाढतच चालीय,

कसा ग मोजू मी तुझी किंमत?

ही सगळी दुनिया तुला संपवण्यात लागली आहे,

कसा ग बचाव करू मी तुझा?

ही सगळी दुनिया तुझा धूर - धूर करून टाकतील,

पण मी कसा ग तुझ्यापासून दूर - दूर होऊ??

तू नाहीस तर मी पण नाही,

तुझ्या विना माझ्या कडे कुणी बघणार पण नाही,

अग प्रिये, मी तुझा प्रियकर वाहन बोलतोय,

तू माझ्यात संचार केला नाहीस,

तर मी कसा ग चालनार?

प्रिये, तू संपू नकोस ग.....

तू संपू नकोस....


साहित्याला गुण द्या
लॉग इन