STORYMIRROR

Ashwinee Chaudhari

Others

3  

Ashwinee Chaudhari

Others

जंगल सफारी

जंगल सफारी

1 min
366

शांत विलोभनीय सकाळ

मनमोहक वाटा आणि जीवनाचा आनंद...


दाट हिरवेगार जंगल, अंधारातील पहाट,

शोध आहे तो फक्त आवाजाचा...

कुजबुज नको, शांततेत पुढे चालत रहा...

ध्यान लावून आवाजाची चाहूल घेत रहा...


मधुर पक्ष्यांचे गीत ऐका पण सुर लावू नका...

ऐकण्याचा गाण्याचा आनंद लुटा...

चालत राहा चौफेर नजर ठेवा...

सुंदर मयुर दिसतील मोरणीसाठी नृत्य करताना

लांबूनच नृत्याची मजा घ्या...

आणि पुढे चला...


गाठायचे आहे उंच मनोरे,

लवकरच येतील वाघ, बिबटे...

उंच मनोऱ्यांवर बसून टीपायच्या वाघ, बिबट्यांच्या छबी...

डरकाळी फोडतील घाबरु नका, ओरडू नका,

जंगलातील मित्रांना त्रास होईल असे वागू नका...


कारण आपण आहोत उंच मनोऱ्यांवर,

आलो आहोत आपल्या मित्रांना भेटायला...

बोला "हकुना मटाटा, हकुना मटाटा..."

आनंदाचे हे जंगली गीत गाऊन झाली पूर्ण आपली जंगल सफारी,

पहाट आत्ताच तर उजाडली...


Rate this content
Log in