STORYMIRROR

Ashwinee Chaudhari

Romance

3  

Ashwinee Chaudhari

Romance

एक मागणी अशी...

एक मागणी अशी...

1 min
212

आयुष्याच्या गजबजलेल्या वाटेवर का कुणास ठावूक मज वाटत होते एकटे,

झगमगणाऱ्या, भरभरल्या जगातही, मी अशीच का एकटी?


या एकटेपणातच सहज नजरेस पडला एक किर्तीवंत,

पाहुनी त्यासी, चाहूल लागली माझ्या मनाला त्याला जाणण्याची!


चेहरा पाहुनी त्याचा वाटले, निख‌‌ळ-निर्मळ आहे किती हा,

तेज त्याच्या चेहऱ्यावरील पाहुनी लोभ माझा ना आवरेना,

इच्छा प्रलोभित झाली भेटण्याची त्याच्या कुटुंबियासी,

आणि मज ओळख पटली नवीन चेहऱ्यांशी, 


अन् शाश्वती पटली तुझ्या निर्मळ निरागस मनाची,

म्हणून आज तूझ्या जन्मदिनी हे प्रियजना, मी मागणी घालते तुझ्या निर्मळ मनाला

माझ्या निरागसतेत सामावून‌ घेशील का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance