निरागस बहाणा...
निरागस बहाणा...
काय सांगू सखे
तुझा हा निरागस बहाणा
पेश केला तू मजसी
प्रीतीचा नजराणा.....
धुंद धुंद समयाची
होती खुमारी अविट
प्रितीला ही फुलली होती
पालवी घनदाट
शब्द तुझे समजू की
समजू तया उखाणा....
पेश केला तू मजसी, प्रितीचा नजराणा...
परिमल असते कमळपरी
भ्रमर घेतो स्वच्छंद स्वाद
तद्वतच तुला नसे ठावूक
तुज मनीचा गोड आल्हाद
फुटलेत पंख आता
माझी या स्वरांना....
पेश केला तू मजसी, प्रीतीचा नजराणा...

