नीरजा
नीरजा
प्रीत जडली(नीरजा रचना)
ना मला समजले
या वळणावर
अलगद
ह्रदयी
जीव गुंतला
भान माझे हरपले
तू माझा सखा
गुणांची खाण
कल्पवृक्ष
कामधेनू
या जगतातील
दाहीदिशा तुझा डंका
तूज न बघता
कासावीस जीव
व्याकूळ
नैराश्य
येई जीवनी
तू जवळी नसता
तुझ्यावरी जडली प्रीत
साथ दे
अखंड
अभंग
या जन्मी
गाईन आनंदे गीत

