"निद्रे सरकार"
"निद्रे सरकार"
आमचं जगणं मुश्किल झालं
मरण आता स्वस्थ केलंं
निद्रावस्थेत सरकार गेलं
सारे खड्डेमय रस्ते झालं
एका मंत्र्याने बक्षिस लावलं
प्रवास करणं अवघड झालं
जगतोय की मरतोय कळना झालं
वेळेचं म्हत्त्वं जाणुनी मोटार वाहान आलं
आता मेट्रो, बुलेट ट्रेननं जाळं विणलं
आम्हाला त्यातुन काय मिळालं ??
आमचं चंद्रयान चंद्रावर गेलं
तेथील माहिती देऊ लागलं
एका नोटेनं एक वेळेच भागलं
आयुष्यातील समस्याचं शुल्कांष्ट नाही संपलं ...
आमचे नेते बोलके पोपट
कोठे नेऊन ठेवलाय माझा महाराट्र
शेतकर्यावर येई सतत संकटं
आस्मानी सुलतानीचा खाल्ला मार
घोषणानचा नुसता पाऊस
आता नेत्यांना भेटायला नाही वेळ
नेत्यांच्या आश्वासनानी आमचा भरलायं झोळ
निर्णयाची करुनी खैरात
निवडुन आलं आता नवं सरकार
