नैसर्गिक आपत्ती - दुष्काळ
नैसर्गिक आपत्ती - दुष्काळ
नाराज झालाय पाऊस माणसावर,
त्यामुळे पाण्यालाही लावलाय दर
दुष्काळ पडला आहे सगळीकडे,
कोरडे पडले नदी, नाले, ओढे
आत्महत्या करू लागले शेतकरी,
काही तरी उपाय काढा यावरी
पाण्यासाठी तडपडत आहे सजीवसृष्टी,
पृथ्वीवर होत आहे अनावृष्टी
पाणी आहे जीवन आपलं,
म्हणूनच त्याला पाहिजे जपलं
