उन्हाळा ऋतू
उन्हाळा ऋतू
1 min
206
उन्हाळ्याचा ऋतू आला
सर्वाना खूप आनंद झाला,
मार्च महिन्यात असते परीक्षा
अभ्यास नाही केलातर मिळते शिक्षा
पेपर झाल्यानंतर लागते शाळेला सुट्टी
मग तर शाळेला का मारायची बुट्टी?
उन्हाळ्यात पडते ऊन खूप
काहीजण खातात आईस्क्रीम गुपचूप
उन्हाळ्यात असतो सर्वत्र IPL चा जल्लोष
क्रिकेट पहाताना राहत नाही कोणालाच होश,
उन्हाळ्यात जायचे मामाकडे
आजीच्या हातचे खायला भेटतात वडे
उन्हाळ्याचा ऋतू सर्वाना आवडतो,
सर्वांच्या मनात रुजून राहतो
