नातं तुझं माझं..
नातं तुझं माझं..
कधी कधी मलाही वाटते
मी तुझ्या भावविश्वात रमून जावे..
तुझ्या कवितां सोबत मीही
आपल्या प्रीतीचे सुरेल गाणे गावे..
तू करावी जुळवाजुळव शब्दकाव्याची
अन् मीही त्यांत चिंब भिजून जावे..
तू माझ्यात अन् मी तुझ्यात वेडा,वेडी
चिंब भिजतांना एकमेकांना पहावे..
तू म्हणजे मुसळधार पावसातील सर
माझ्या कोमल मनाला नवी प्रेरणा देणारा..
केला प्रीतीचा गुन्हा अपराधी नको समजू
माझ्या जीवन पुस्तकांत रोज मला दिसणारा..

