तु....
तु....
1 min
294
मी तुझी अन् तु माझा
ओढ कशी हि लागली .....
ध्यास तुझा हा असा कसा
झुरवी तुला अन् मलाही....
अबोल तु अन् अबोल मीही
शब्दाविना का खेळ हा .....
निशब्द प्रित किती दिवस अशी
तु तरी बोलना ......
कळते मला प्रेम तुझे
भावना माझ्या कळतील का.....
गुपीत तु तुझ्या ह्रदयीचे
माझ्या समीप तु खोलना....
ह्रदयी माझ्या उठे
भाव तरंग
ओढ तुझ्या मिलनाची...
सांग तुला
आस का माझ्या भेटीची .. ..
मी तुझी अन् तु माझा
ओढ अशी हि लागली....
