साथ देशील का...
साथ देशील का...
1 min
562
स्पंदने माझ्या हृदयाची
हाक देती सख्या तुला...
हाक ऐकुनी या हृदयाची
साद देशील का? तू मला...
या स्पंदनावरी झुलावी
प्रीत आपल्या प्रेमाची...
भिल्लाच्या भात्यातील
बाणाच्या टोकापरी नेमाची...
येते गुलाबी झुळूक आणि
छळती मला तुझे भास रे...
लागला सख्या का?असा
कस्तुरी परी तुझा ध्यास रे...
श्वास हे वेडे तुझ्यासाठी
अन् शब्दही माझे झुरती...
भास होती तुझेच मजला
स्वप्नही अलगद विरती...
एक मागणे तुझ्याकडे
दे कुशीत मला विसावा...
करी हा जीव आकांत का?
छळतो मला तुझाच दुरावा...
