नातं मैत्रीचं
नातं मैत्रीचं


मैत्रीचं नातं तू समजून घे
केलीच आहेस तर उमजून घे
येतात अडचणी खूप
त्या थोड्या सोसून बघ
सगळ्यामध्ये मला तोलू नकोस
मी पण वाईट असं समजू नकोस
आयुष्यभर देईन साथ
नातं एकदा जुळवून बघ
काटेरी या जीवनात
सोबत तर घेऊन बघ
नाही सोडणार तुला
साथ तर देऊन बघ
आयुष्याच्या खडतर वाटेवर
मित्राला आवाज देऊन बघ
दुःखाचा तरी वाटेकरी
मला बनवून बघ
मैत्रीच्या या नात्यावर
विश्वास ठेवून तर बघ
नाही तुटणार कधी
एकदा जोडून तर बघ....!