STORYMIRROR

Deepa Vankudre

Romance

4  

Deepa Vankudre

Romance

नाते तुझे नि माझे

नाते तुझे नि माझे

1 min
311

कसे न कळले

हे नाते तुझे नि माझे 

जणू युगायुगांचे जडले


ओळख पहिली 

आठवते आज मज 

नजरेतून दाद तू दिली


गालावर लाली 

लाजेने कशी चढली

अधरांची थरथर झाली 


मन बावरले

चाहूल नव स्वप्नांची 

तुझ्या कवेत मी सावरले


दिले तू वचन 

दूर कधी न जाणार 

त्या एका क्षणी झाले मिलन 


प्रीत निभवावी

तुझियासवे अशीच 

जन्मोजन्मीची साथ मिळावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance