मरणानंतर
मरणानंतर
जेव्हा येईल माझं मरण
मला असंच नका जाऊ देऊ
कुणा दृष्टीहीन खाचांतून
माझ्या डोळ्यांना पाहू दे जग
कुणाच्या भरल्या जखमा
झाकून जाऊ देत माझ्या त्वचेने
कुणाचे थकले उसासे
मोकळे व्हावे माझ्या श्वासांनी
चिरंतन राहो 'आपल्यांचं' प्रेम
कुणाच्या तरी हृदय कप्प्यात
आपल्या मागे पाच पंचवीसांच्या भल्यासाठी तरी रहावं...
निरोगी... सुंदर...
नाही?
