STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Romance Others

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Romance Others

मृदगंध पावसाचा - आठवणीत तुझ्या ...

मृदगंध पावसाचा - आठवणीत तुझ्या ...

1 min
221

अंगावर जेव्हा येतात या पावसाच्या ओलसर सरी,

मनातून उफाळून येतात तुझ्यासंग "त्या" लहरी,

तुझ्या-माझ्या प्रेमाचा वर्षाव होतो मज मनावरी,

तू आणि हा पाऊस मला सदा मृदगंध करी ...

                आठवणीत तुझ्या ...


तुझ्या येण्याने मनाच्या कोपऱ्यात चैतन्य लहरते,

माझे रूप, शृंगार नजर, तुझ्या मिठीतच बहरते,

तू मायेने केलेल्या प्रेमात मी अखंड भिजते,

जवळ असता तू, अंगात माझ्या रोमांच संचारते ...

                   आठवणीत तुझ्या ...


नजरेला नजर भिडताच स्पंदने वेगाने धावतात,

काळजाच्या तिडकीने मग हळुवार जायबंद होतात,

माझ्याही नकळत ती तुझीच होऊन जातात,

स्पर्शाने झालेले घाव, होणाऱ्या आनंदाला कुठे कळतात ...

                      आठवणीत तुझ्या ...


बेफान होऊन सजलेल्या "त्या" आठवणी रोजच छळतात,

तू इथेच आहेस माझ्याशी खेळत, याचेच भास होतात,

साज शृंगार केल्यावर, आताही माझ्या पापण्या पाणावतात,

याद येताच तुझी, देहातून जणू ज्वालाग्नी निघतात ...

                      आठवणीत तुझ्या ...


कसं विसरू सांग ना, तुझ्या होणाऱ्या चाहुलखुणा,

अजूनही एकटं वाटल्यावर, जाणवतात तुझ्या पाऊलखुणा,

कसं थोपवू,मी, डोळ्यांतून धारेने वाहणाऱ्या अश्रूंना,

कसं थांबवू, तुझ्याकडे ओढ लागलेल्या या माझ्या वेड्या मना ...

                     आठवणीत तुझ्या ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance