STORYMIRROR

Shobha Wagle

Classics

4  

Shobha Wagle

Classics

मराठी दिन

मराठी दिन

1 min
276

आज मराठी दिन भाषेचा करू साजरा आनंदाने

कुसुमाग्रज ते ज्ञानपिठाच्या कवीवरांच्या जन्मदिनाने


मूळ मराठी संस्कृतातुनी , उमगते तरी सामान्यांना

कळण्यासाठी सोपी केली , भगवद गीता ज्ञानोबाने


प्रेमळ भाषा मवाळ बोली देवनागरी लेखन लिपिची

काना मात्रा वेलांट्यांनी , मढलेल्या त्या आभुषणाने


बाविस पैकी तिसरा नंबर या भाषेचा भारतातला

सुंदर भाषा लोक बोलती माय मराठी गोड मुखाने


जगात आहे महान वाङमय , अभंग वाणी साहित्यातली

गौरव शाली शान राखली, शिवरायांनी अभिमानाने.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics