मोहिनी
मोहिनी
आहाहा ह्या वैशाख वणव्यात
अल्हाददायक मोहक शितल
हवीहवीशी झुळूक जणू तू
जुन्या मदिरेची नशाच आगळी
चाखता दरवेळी, चव वेगळी
भेटणे, लाभणे दुर्मिळ भारी
चुकवावे लागते मोल हि भारी
नवी मोहिनी तर जुनी संमोहिनी
भूलले तेही भूलले हेही
तु मोहीनी संमोहिनी
मनमोहीनी सुंदरी तू
मनास खुलवी प्रीत जागवी
अशी लावण्य सखी अप्सरा तु
एक ती वेळ मखमली
एक तु आठवणीतली
एक ही वेळ प्रतीक्षेची
तीच तु आठवण देती
तीच तु सुंदरी तेंव्हाची
तशीच मोहक आजही
हे मादक स्मित, रसरसित अधर
हे गुलाबी गाल, हे नयन प्याले
खुणावतात, बोलावतात
मज थेट देतात आव्हान
बुडून जा नशेत या
ये ये लुट गुलाब मधु
पी पी हि अधर मदिरा

