STORYMIRROR

Ganesh Punde

Romance

3  

Ganesh Punde

Romance

मोगऱ्याचा गजरा

मोगऱ्याचा गजरा

1 min
542

गजरा माळून आजही जेव्हा हसतेस तू

खरी स्वर्गाची अप्सरा मला दिसतेस तू


मोहक सुंदर रूप तुझे डोळ्यात ठेऊन राहतो

चेहरा आरशात माझा नजरेत तुलाच पाहतो

डोळ्यासमोर माझ्या जेव्हा सजतेस तू


मोगऱ्याचा गजरा हा तुझे सौंदर्य खुलवतो

रोखतो माझा श्वास मी नजर फक्त चलवतो

सुहास येता मोगऱ्याचा मला आठवतेस तू


तुझं माझं प्रेम तसं जगाच्या आगळ वेगळं

भांडण ही मिटत सखे एका गजऱ्यात सगळं

विसरून राग सारा जेव्हा लाजतेस तू


दरवळतो मन मोगरा गजरा फक्त निमित्त

प्रेम मनातून मनाचे वेडी मनाची प्रीत 

अलगद बिलगून जवळ जेव्हा बसतेस तू

स्वर्गाची अप्सरा मला दिसतेस तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance