मनी आठवण तुझी रुजावी...
मनी आठवण तुझी रुजावी...
प्रेमाच्या वाहत्या किनाऱ्यावर स्वप्न तुझे पडावे..
त्या स्वप्नात तुझ्या रमताना सखे, रात सरावी..
अशातच जवळी भास तुझा होता,
विसर माझा मला पडावा..
सरलेल्या या रातीत सखे,
मनमोहक साज तुझा दिसावा..
स्वप्नी साजशृंगार पाहूनही तुझा,
मनी माझ्या पुन्हा आठवण तुझी रुजावी..
पुन्हा आठवण तुझीच रुजावी..