Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bhimesh Bhitre

Fantasy

3  

Bhimesh Bhitre

Fantasy

मंगळावर जाऊ

मंगळावर जाऊ

1 min
468


किती दिवस असे

आपण पृथ्वीवरच राहु

चल न गं प्रिये आपण

मंगळावर जाऊ


वाइट नजरा आहेत

लोकांच्या गं इथे

भेटु नाही देत ते

आपल्याला कुठे


दिसलो कधी सोबत

तर ऊगाच करतात बाऊ

चल न गं प्रिये आपण

मंगळावर जाऊ


मंगळा वर अजुन तरी

जीव सापडला नाही

आपल्याला तसा एकांत

इथ सापडणार नाही


तिथ आपण खुलेआम

प्रेमाचे गीत गाऊ

चल न गं प्रिये आपण

मंगळावर जाऊ


2022 ला म्हणे

यान पाठवणार आहेत

यानात ह्या वेळेस

मानव पाठवणार आहेत


चल आपणच त्या यानात

सवार होऊन जाऊ

चल न गं प्रिये आपण

मंगळावर जाऊ



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy