STORYMIRROR

शशिकांत राऊत

Fantasy

4  

शशिकांत राऊत

Fantasy

चंदेरी दुनिया

चंदेरी दुनिया

1 min
226

वृत्त प्रकार :- परिलीना : 


पुनवेचा चंद्रमा आभाळी आला,

जाणवते चंदेरी दुनियेची शाळा।।


चांदण्यात रात्रीचे जमूनिया तारे,

अंबरात चंचल ते मारतात फेरे,

जणुकाही ताऱ्यांची सौंदर्ये माला।।


नवलाई आकाशी उधळूनी मोती,

कमानीत गंगेच्या उजळूनी ज्योती,

रचनेची अवकाशी वर्णावी लीला।।


जाणवेल सुंदर तो सप्तर्षी तारा,

वर्तुळात जादूचा लखाखती पारा,

धरेवरी शोभतसे तारांगण मेळा।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy