STORYMIRROR

शशिकांत राऊत

Children

3  

शशिकांत राऊत

Children

बेडूक गाणी

बेडूक गाणी

1 min
300

पाऊस आला

रिमझिम पडत

मी झालो ओला...


     शिवार सारा

     पावसाने भिजला

     सरींच्या धारा...


डोंगर माती

दाखवू लागली ती

हिरवी छाती...


     मंजुळ गाणी

     गावयास लागली

     कोकीळ वाणी...


वाऱ्याची झळ

जोरदार पाऊस

ती पळापळ...


     डबके सारे

     पावसाने भरले

     बेडूक घरे...


पडती कानी

डबक्यामधून ती

बेडूक गाणी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children