लाल माती
लाल माती
तिच्यासाठी .. सारखेच सारे
ति ना जाणे .. कोणत्याच जाती
सगळेच आहेत .. तिची लेकरे
आहे सगळ्यांची .. ती माय माती
ह्या लेकरांमधला .. भांडण तंटा
जेव्हां कधी .. बघते माती
पहावत नाही .. तिला हे सारे
एकटीच ती .. रडते माती
पण तेव्हा तर .. हद्दच होते
तेव्हां होते .. घायाळ माती
जेव्हां कधी .. तिच्याच लेकरांच्या
रक्ताने होते .. ती लाल माती !
रक्ताने होते .. ती लाल माती !
