STORYMIRROR

Shital Amar Kale

Abstract Romance Others

3  

Shital Amar Kale

Abstract Romance Others

मनातलं साधं सरळ हितगुज

मनातलं साधं सरळ हितगुज

1 min
210

तुला काहीतरी सांगायचंय,

सांगेन म्हणते खरं पण सांगून सांगून

संपेल का याची खात्री नाहीये

शब्द गवसतात अर्थ कळतात,

वही पेन ची सांगड लागते,

लिहीन म्हणते पण लिहिणं थाबेल का

सांगता येत नाहिये

तूझं प्रेम म्हणजे पृथ्वीला चंद्राने

घातलेली साद च जणू

तुझा विश्वास म्हणजे सागराने किनाऱ्याला

घातलेली गवसणीच जणू

तुझी आतुरता म्हणजे नभाने धरणीवर केलेला

पावसाचा वर्षावच जणू...

 अंगणी वाऱ्याच्या हिंदोळ्यावर

खेळणारा मोगरा जेव्हा रोज फुलतो ना,

खरतर नजरेत त्याच्या मला तुझा भास होतो..

   पूर्वी तुझं माझ्या आयुष्यात येणं हे माझं स्वप्न होतं, 

आता तुझ्याच सोबत जगणं ही स्वप्नपूर्ती

अशीच डोळे भरून मी रोज अनुभवते..

तूझं माझ्यासोबत असणं

हे माझ्यासाठी केवळ "असणं" नसतं  

मी " मी "आहे या माझ्या अस्तित्वाचं

एक खात्रीशीर कारण असतं...

तू अगदी सहज म्हणतोस

तुझ माझ्याकडे लक्ष नसतं म्हणून,

पण आपल्याच संसारात गुरफटलेली मी

"आपल्यातच दंग असते,

हे तुला कळत नसतं.....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract