'मनाचा किनारा' (षडाक्षरीरचना)
'मनाचा किनारा' (षडाक्षरीरचना)
भयाण जंगल
किरकिर किडे..!!
अस्थिर मनात
काहूर चौघडे..!!
डोहात बुडता
चक्रव्यूह खोल..!!
मीच माझ्यासंगे
होतोय अबोल..!!
निळ्या समुद्राचे
डंखणे विषारी..!!
कपटी जगाची
फुत्कार हुशारी..!!
अपंगू मनाला
आधार दुबळा..!!
त्सुनामी लाटांचा
मार्गही आंधळा..!!
संघर्ष सागरी
बुडत्या जीवाचा..!!
ईश्वर भेटला
संयम नावाचा..!!
विश्वास जागला
आधार जाणला..!!
सागर किनारा
मनाचा लाभला..!!
